आषाढी यात्रेसाठी यंदा ३५०० एस.टी. बस
By Admin | Updated: June 11, 2017 01:57 IST2017-06-11T01:57:51+5:302017-06-11T01:57:51+5:30
आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यंदा ३५०० बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत.श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज

आषाढी यात्रेसाठी यंदा ३५०० एस.टी. बस
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यंदा ३५०० बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत.
श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी पंढरपुरात येतात. त्यांच्या येण्या-जाण्याची सोय महामंडळाने केली आहे.
इतर भाविकांना राज्यभरातून येण्यासाठी आणि परत गावी जाण्यासाठी महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १ ते १० जुलैदरम्यान ही सोय करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.