शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दूध पिशव्यांचा दररोजचा ३५ टनांचा होतो कचरा : रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 22:57 IST

राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा तयार होतो.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीनंतर ३० टक्के वापर थांबवू शकलो नाही

पुणे : राज्यात लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील ३० टक्के प्लास्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा तयार होतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्यास आपण दररोज ३५ टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करु शकतो, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी येथे सांगितले.अमनोरा पार्क टाऊन मधील साडेपाच हजार कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लॅस्टिक परत घेण्याच्या उपक्रमास कदम यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्कटाऊन व सिटी कॉपोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रीसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रीसायकलचे चेतन बारेगर या वेळी उपस्थित होते.अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लॅस्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक ‘रीलूप’ या अ‍ॅपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. यात गोळा केलेल्या प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना प्रतिकिलो २० गुण म्हणजेच २० रुपये अ‍ॅपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे गुण नागरिक वेगवेगळ्या २०० ब्रँड्सच्या खरेदीसाठी वापरु शकतील, असे कदम यांनी सांगितले.श्रीवास्तव म्हणाले, प्लास्टिक कचºयात गेल्यास त्यातील पुर्ननिर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचºयातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लास्टिक संचय व पुर्ननिर्मिती गरजेची आहे.अमनोरामध्ये २०१० पासूनच प्लॅस्टिक गोळा करून पुर्ननिर्मितीस देण्यास सुरूवात केली असून, अमनोराला राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त टाऊनशिप करण्यासाठी प्रयत्न करु,असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.अभय देशपांडे म्हणाले, अधिकाधिक नागरिकांना प्लॅस्टिक जमा करून ते पुर्ननिर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये ३०० ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडील धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. ---------------------दूध पिशवीमागे मिळणार पैसे‘दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे व १ लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे परत दिले जाणार असल्याचे, श्रीपाद चितळे यांनी सांगितले. ------------------

 

टॅग्स :PuneपुणेmilkदूधPlastic banप्लॅस्टिक बंदी