३५ टक्के झिंदाबाद! निरंजन बिराजदारची काठावर बॅटिंग

By Admin | Updated: June 13, 2017 21:24 IST2017-06-13T21:24:37+5:302017-06-13T21:24:37+5:30

विलासराव शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी निरंजन श्रीशैल बिराजदार याने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात

35 percent of the time! On the edge of Niranjan Beirajdar | ३५ टक्के झिंदाबाद! निरंजन बिराजदारची काठावर बॅटिंग

३५ टक्के झिंदाबाद! निरंजन बिराजदारची काठावर बॅटिंग

ऑनलाइन लोकमत
आष्टा (सांगली), दि. 13 - आष्टा (ता. वाळवा) येथील राजाराम शिक्षण संस्थेच्या विलासराव शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी निरंजन श्रीशैल बिराजदार याने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवून अनोखा विक्रम केला आहे. परिसरात त्याच्या विक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
निरंजन बिराजदार आष्ट्याशेजारच्या मिरजवाडी येथील असून, तो दररोज मिरजवाडीहून शिक्षणासाठी आष्टा येथे विलासराव शिंदे विद्यालयात येत होता. दहावीच्या परीक्षेत आपण पास होणारच, असा त्याला विश्वास होता, मात्र नातेवाईकांना त्याबाबत खात्री नव्हती. मंगळवारी निकाल जाहीर झाला, मात्र निरंजनने सायंकाळी निकाल तपासला. स्वत:वरचा विश्वास सार्थ ठरवत त्याने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या सर्व विषयात नेमके ३५ गुण मिळवले आहेत. ५०० पैकी १७५ गुण मिळवीत त्याने अनोखा विक्रम केला आहे. परिसरात त्याच्या विक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्राचार्य विशाल शिंदे, शहाजी पाटील, अशोक पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

Web Title: 35 percent of the time! On the edge of Niranjan Beirajdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.