शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मुंबई-पुणे महामार्गावर ३४ टक्के चुकीचे चलान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:52 IST

मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी करण्यात आले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याचे वाहतूकदार के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलात उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘आयटीएमएस’च्या कार्यक्षमतेवर वाहनचालक आणि वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर जुलै २०२४ पासून ‘आयटीएमएस’चा वापर सुरू झाला. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. १०० कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पासाठी परिवहन विभागाने ४५ कोटी दिले आहेत. ‘एमएसआरटीसी’ने ‘आयटीएमएस’चा भाग म्हणून ४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही या महामार्गावर कॅमेरे बसवले आहेत. 

१७ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास चलान ‘आयटीएमएस’मुळे महामार्गावरील अपघात रोखण्यास मदत झाली असली तरी, चुकीच्या ई-चलानची संख्या मोठी आहे. ओव्हर स्पीडिंग, सीटबेल्ट न लावणे, लेन कापणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि मोबाइलचा वापर यांसारख्या १७ प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ई-चलान जारी होतात. मात्र, ओव्हर स्पीडिंगव्यतिरिक्त इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेकवेळा चुकीचे चलान झाल्याने काही चलान रद्द केले आहेत.

१२ टक्के दंड वसूल ‘आयटीएमएस’द्वारे वाहतूक उल्लंघनाचा अहवाल तयार केला जातो आणि ऑपरेटरचे कर्मचारी कमांड कंट्रोल सेंटर (सीसीसी) येथे त्याची पडताळणी करतात. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी चलान मंजूर करावे लागते. या महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी केले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याने रद्द झाले. उर्वरित १२४ कोटी २४ लाख रुपयांचे १२ लाख चलान होते. त्यापैकी जानेवारी २०२५ पर्यंत केवळ १२ टक्के चलानचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्रtraffic policeवाहतूक पोलीस