बसपाचे विदर्भ-मराठवाड्यातील ३४ उमेदवार निश्चित
By Admin | Updated: September 4, 2014 01:30 IST2014-09-04T01:29:52+5:302014-09-04T01:30:01+5:30
बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार; ३४ उमेदवार बुधवारी निश्चित करणार.

बसपाचे विदर्भ-मराठवाड्यातील ३४ उमेदवार निश्चित
अकोला : बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असून, त्यासाठी उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बसपाचे ३४ उमेदवार बुधवारी निश्चित करण्यात करण्यात आले.
मतदारसंघनिहाय इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियादेखील बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील २0 आणि मराठवाड्यातील १४ असे ३४ उमेदवार पक्षाकडून निश्चित करण्यात आले. उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ८ सप्टेंबर रोजी नागपूर येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती बसपाचे राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश प्रभारीडॉ. सुरेश माने यांनी दिली.