शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आजी-माजी आमदार, खासदारांवरील ३३७ खटले प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:52 IST

उच्च न्यायालयात ४५ प्रकरणे; २८ ऑक्टोबर रोजी सुनावणीचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील आजी-माजी आमदार-खासदारांवर राज्यातील विविध न्यायालयांमध्ये ३३७ फौजदारी गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेच ही माहिती सर्वोच्च न्यायालयास कळविली आहे.लोकप्रतिनिधींवरील खटल्यांचा व ते जलद गतीने निकाली काढण्यासाठी काय करता येईल याचा विषय एका जनहित याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. त्या प्रकरणात मध्यंतरी प्रत्येक उच्च न्यायालयाकडून त्यांच्या राज्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांची व ते निकाली काढण्यासाठी योजण्यात येत असलेल्या उपायांची माहिती मागविली होती. ती प्राप्त झाल्यावर अ‍ॅमायकस क्युरी म्हणून नेमलेल्या विजय हंसारिया या वकिलाने त्याचे संकलन करून त्यासंबंधीचा आपला अभिप्रायही सादर केला.मुंबई उच्च न्यायालयाने कळविलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजी-माजी आमदार व खासदारांवरील एकूण ३३७ प्रलंबित खटल्यांपैकी ६५ विविध जिल्ह्यांतील सत्र न्यायालयांत तर २२७ दंडाधिकारी न्यायालयांत प्रलंबित आहेत. खुद्द उच्च न्यायालयात ४५ प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी २६ मुंबईत तर बाकीची नागपूर व औरंगाबाद खंडपीठांकडे आहेत. उच्च न्यायालयांतील १३ प्रकरणांमध्ये स्थगिती देण्यात आली आहे.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली अशी सर्व प्रकरणे निर्धारित खंडपीठापुढे येत्या २८ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी लावावी व त्यापैकी ज्यांत स्थगिती दिलेली आहे अशा प्रकऱणांना अग्रक्रम द्यावा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्र्तींनी दिले आहेत.देशभरात ४,८५९ खटले निकालाच्या प्रतीक्षेतदेशात अशा प्रकारचे एकूण ४,८५९ खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घातल्यापासून गेल्या दोन वर्षांत खटल्यांची संख्या कमी होण्याऐवजी त्यांत ४,१२२ पासून आताच्या ४,८५९पर्यंत वाढ झाली आहे.सर्वाधिक १,३७४ खटले उत्तर प्रदेशात आहेत. त्यानंतर ओडिशा (४४५) तमिळनाडू (३६१) महाराष्ट्र व केरळसह (३२४) आहेत.

टॅग्स :MLAआमदारCourtन्यायालय