किरकोळ वादातून ३२ वर्षीय इसमाची हत्या

By Admin | Updated: June 11, 2016 03:58 IST2016-06-11T03:58:22+5:302016-06-11T03:58:22+5:30

किरकोळ वादातून गुरुवारी मध्यरात्री घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात रूपेश मयेकर (३२) याची हत्या झाली.

32-year-old Isma assassination | किरकोळ वादातून ३२ वर्षीय इसमाची हत्या

किरकोळ वादातून ३२ वर्षीय इसमाची हत्या


मुंबई : किरकोळ वादातून गुरुवारी मध्यरात्री घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात रूपेश मयेकर (३२) याची हत्या झाली. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शेजारी राहणाऱ्या प्रदीप वरेकरसोबत सोमवारी रात्री रूपेशचा दारू पिण्यावरून वाद झाला. याच रागात प्रदीपने त्याच्या डोक्यात लाकडी बांबू मारला. रूपेशला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपीने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मयेकरला राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. नातेवाईक व घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या जबाबावरून हत्येमागे प्रदीप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या प्रदीपचा शोध सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 32-year-old Isma assassination