शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रामध्ये चार वर्षांत ३२ वाघांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:49 IST

गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले

 - गणेश वासनिक 

अमरावती  - गेल्या चार वर्षांमध्ये विविध कारणांनी राज्यात ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. वाघांच्या मृत्यूप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना जाब विचारला आहे.मध्य भारतात मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक ३०० हून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांची संख्या दुप्पट झाली. व्याघ्र संवर्धनाचे हे मॉडल उत्तर प्रदेशने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात वाघांचे संरक्षण व संवर्धन कसे केले जाते, याचे धडे वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी उत्तर प्रदेशला दिले. राज्यात मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्याद्री, बोर, नवेगाव-नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प असून, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेंच, मेळघाट, ताडोबा आणि बोर प्रकल्पांच्या सीमा वाढविण्यावर भर दिला जात आहे. असे असले तरी गेल्या चार वर्षात बेहलिया टोळीने विदर्भातील वाघांना शिकारीच्या जाळ्यात अडकविले आहे. त्यांच्याकडून वाढता धोका लक्षात घेऊन व्याघ्र कृती दल निर्माण करून पेसा कायद्यानुसार मेळघाटात वनकर्मचाºयांची भरती करण्यात आली. जीपीएस प्रणाली, कॅमेरा ट्रॅपिंग अशा अद्ययावत यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमधून जाणा-या महामार्गाचा धोकादेखील वाघांना निर्माण झालेला आहे. 

असा झाला वाघांचा अंतगेल्या चार वर्षांत राज्यात विशेषत: विदर्भात एकूण ३२ वाघांचे दुर्दैवी मृत्यू झाले. याला विविध कारणे आहेत. वाघांचे २३ मृत्यू नैसर्गिक, आठ शिकारीमुळे, तर एक वाघ अपघातात ठार झाला. जानेवारी २०१८ पर्यंतची ही आकडेवारी राज्याच्या वन्यजीव विभागाने शासनाला सादर केली आहे. 

उपाययोजनांचा आढावावाघांच्या संरक्षणासाठी राज्य शासन गंभीर असले तरी व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाºया उपाययोजना तोकड्या असल्याचे मानले जाते. व्याघ्र संवर्धनासाठी निधी, कर्मचाºयांची कमतरता ही नित्याचीच बाब आहे.

शिका-यांचा डोळाविदर्भात वाघांची संख्या २२० ते २३५ च्या आसपास आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातील बहेलिया टोळीने शिकारीसाठी विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना लक्ष केले आहेत. चार वर्षांत ३२ वाघांच्या मृत्यूने राज्य शासन खडबडून जागे झाले आहे.

 

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र