‘त्या’ वसतिगृहात ३२ मुलींचे लैंगिक शोषण
By Admin | Updated: January 3, 2015 01:50 IST2015-01-03T01:50:14+5:302015-01-03T01:50:14+5:30
तपोवन येथील बाल वसतिगृहात तब्बल ३२ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे राज्य महिला आयोगाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.

‘त्या’ वसतिगृहात ३२ मुलींचे लैंगिक शोषण
अहवाल : महिला आयोगाकडून चौकशी
अमरावती : तपोवन येथील बाल वसतिगृहात तब्बल ३२ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे राज्य महिला आयोगाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविल्याची माहिती आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्यातील शासकीय वा खासगी संस्थांच्या वसतिगृहात मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे़
वसतिगृहातील एका मुलीने ११ डिसेंबर २०१४ रोजी वसतिगृहातील इलेक्ट्रिशियन नारायण कोटेवार याने लैंगिक शोषण केल्याची लेखी तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर लगेच तीन दिवसांनी अन्य एका मुलीने अत्याचार झाल्याबाबत तक्रार नोंदविली. या तक्रारींच्या आधारे दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी संस्थेतील दोन पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलावरही लैंगिक शोषणाचा आरोप मुलीने केला आहे. पोलिसांकडून तपोवन वसतिगृहात तक्रार पेटी लावण्यात आली. यातील ३२ तक्रारी लैंगिक शोषणाबाबतच्या आहेत. चौकशीअंती दोषींवर कारवाईचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. महिला आयोगाला प्राप्त झालेल्या ३२ तक्रारींमध्ये काही मुलींचे विनयभंग, तर काहींवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
च्तक्रार पेटीतील ३५ पैकी ३२ तक्रारी लैंगिक शोषणाबाबतच्या असल्याचे राज्य महिला आयोगाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयोगाने पोलीस विभाग, बालकल्याण समिती व संस्थेकडून मागविलेल्या अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.