‘आरएल’च्या ३१५ कोटींच्या मालमत्ता जप्त; SBI ला ३५२.४९ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:33 AM2023-10-16T06:33:24+5:302023-10-16T06:33:40+5:30

ऑगस्टमध्ये ‘ईडी’ ने आरएलच्या आस्थापनांवर छापे टाकले हाेते. यानंतर आर. एल. ज्वेलर्सच्या शोरूममधील रोख रक्कम आणि सोन्याचा स्टॉक सील केला होता. 

315 crore assets of 'RL' seized; ED Action on Rajmal Lakhichand | ‘आरएल’च्या ३१५ कोटींच्या मालमत्ता जप्त; SBI ला ३५२.४९ कोटींचे नुकसान

‘आरएल’च्या ३१५ कोटींच्या मालमत्ता जप्त; SBI ला ३५२.४९ कोटींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आरएल समूहाने घेतलेले कर्ज थकल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या समूहाच्या ठिकठिकाणच्या ३१५.६० कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त  केल्या आहेत. कारवाईबाबत माहिती मिळालेली नसून या विषयी वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे आर. एल. समूहाचे संचालक मनीष जैन यांनी सांगितले. 

ऑगस्टमध्ये ‘ईडी’ ने आरएलच्या आस्थापनांवर छापे टाकले हाेते. यानंतर आर. एल. ज्वेलर्सच्या शोरूममधील रोख रक्कम आणि सोन्याचा स्टॉक सील केला होता. 

बँकेला किती नुकसान?
षङ्यंत्र, फसवणूक, खोटेपणा आणि गुन्हेगारी वर्तन अशा चुकीच्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला ३५२.४९ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे ईडीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नेमके काय जप्त केले?
nजळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छ आणि इतर ठिकाणच्या ७० स्थावर मालमत्ता
nपवनचक्क्या, चांदी, हिरे
nराजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लिमिटेड, आर. एल. गोल्ड व मानराज ज्वेलर्स, प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन यांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे.

Web Title: 315 crore assets of 'RL' seized; ED Action on Rajmal Lakhichand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.