पश्चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा!
By Admin | Updated: September 17, 2014 02:52 IST2014-09-17T02:52:39+5:302014-09-17T02:52:39+5:30
शेतक-यांना युरिया मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ.

पश्चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा!
अकोला : पश्चिम विदर्भात ३0 हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतकर्यांना हे खत मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन युरियाची गरज होती. तशी नोंदणीसुद्धा कृषी विभागामार्फ त करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंंंत १ लाख ४६ हजार ६३0 मेट्रिक टन युरियाचा साठा अमरावती विभागाला प्राप्त झाला आहे. या खताची टक्केवारी ८३.४१ आहे; परंतु यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने शेतकर्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली आणि त्यामुळे शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात युरियाचा वापर केला. त्यानंतर सलग आठ दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली. म्हणून शेतकर्यांना पुन्हा युरियाची फवारणी करावी लागली. त्यातच बाजारपेठेत युरिया असतानाही काही विक्रेत्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण के ल्याने शेतकर्यांना धावपळ करावी लागत आहे. दरम्यान, आजमितीस या पाच जिल्ह्यात २९ हजार १७0 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अकोला जिल्हय़ाचे चित्र बघितल्यास या जिल्हय़ाला १९,४00 मेट्रिक टन युरिया खताची गरज होती; परंतु आतापर्यंंत ११ हजार ८२८ मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. म्हणजेच या जिल्हय़ात ८ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा आहे. बुलडाणा जिल्हय़ाला ५५ हजार ७00 मेट्रिक टन युरिया अपेक्षित होता. येथेही केवळ ३२ हजार ५८३ मेट्रिक टन युरियाच उपलब्ध झाला आहे. या जिल्हय़ात २३ हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा आहे. विभागाला आतापर्यंंंत ८३.४१ टक्के युरिया खताचा साठा उपलब्ध झाला असून, या खताचे व्यवस्थित वितरण करण्यात आले आहे. उर्वरित साठा लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे अमरावतीचे बियाणे व खते, तंत्र अधिकारी बी.एच. इंधाने यांनी सांगितले.