राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

By Admin | Updated: September 3, 2014 02:51 IST2014-09-03T02:51:29+5:302014-09-03T02:51:29+5:30

इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला

3,000 MW power shortage in the state | राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

मुंबई : इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला असून गंभीर संकट उभे राहिले आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले.
या कंपन्यांना पुरेसा अन् दज्रेदार कोळसा मिळत नाही. कोळशावरील आयात कर वाढला आहे. हे दोन्ही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौ:याहून परतताच या प्रश्नावर तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राबरोबरच इतर काही राज्यांना विजेचा तुटवडा जाणवत असून हे राष्ट्रीय संकट बनले आहे. ते दूर करण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचे ते म्हणाले.
राज्याला सध्या दररोज 13 हजार मेगाव्ॉट विजेची गरज असून 1क् हजार मेगाव्ॉट इतकीच वीज मिळत आहे. मंगळवारी मुंबईतील अनेक 
भागात वीज जाण्याचा थेट संबंध सध्याच्या वीज संकटाशी आहे, 
असे मुख्यमंत्री म्हणाले. 
                    (विशेष प्रतिनिधी)
 
वीजसंकटावर तोडगा काढण्यासाठी पवार दिल्लीत
च्कोळसा प्रकरणाच्या निकालानंतर उद्भवलेला पेच सोडविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण होऊ शकते, यावर तातडीने मार्ग काढा असे त्यांनी गोयल यांना सांगितल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
च्ते दुपारी एकच्या दरम्यान दिल्लीत पोहोचले. त्यांतर त्यांनी गोयल यांची भेट घेतली. यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा,राज्यस्थान व पंजाबच्या ऊर्जा सचिवांची बैठक केंद्रीय ऊर्जा सचिवांसोबत होणार आहे.

 

Web Title: 3,000 MW power shortage in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.