पश्चिम विदर्भात 3क् हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा!
By Admin | Updated: September 17, 2014 02:56 IST2014-09-17T02:56:39+5:302014-09-17T02:56:39+5:30
पश्चिम विदर्भात 3क् हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतक:यांना हे खत मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

पश्चिम विदर्भात 3क् हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा!
अकोला : पश्चिम विदर्भात 3क् हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतक:यांना हे खत मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी 1 लाख 75 हजार मेट्रिक टन युरियाची गरज होती.
तशी नोंदणीसुद्धा कृषी विभागामार्फ त करण्यात आली होती. त्यापैकी आतार्पयत 1 लाख 46 हजार 63क् मेट्रिक टन युरियाचा साठा अमरावती विभागाला प्राप्त झाला आहे. या खताची टक्केवारी 83.41 आहे; परंतु यावर्षी सुरुवातीला पाऊस नसल्याने शेतक:यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली आणि त्यामुळे शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणात युरियाचा वापर केला.
त्यानंतर सलग आठ दिवस रिमङिाम पाऊस होता. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली. म्हणून शेतक:यांना पुन्हा युरियाची फवारणी करावी लागली. त्यातच बाजारपेठेत युरिया असतानाही काही विक्रेत्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण के ल्याने शेतक:यांना धावपळ करावी लागत आहे.
दरम्यान, आजमितीस या पाच जिल्ह्यात 29 हजार 17क् मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अकोला जिल्हय़ाचे चित्र बघितल्यास या जिल्हय़ाला 19,4क्क् मेट्रिक टन युरिया खताची गरज होती; परंतु आतार्पयत 11 हजार 828 मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. म्हणजेच या जिल्हय़ात 8 हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा आहे. बुलडाणा जिल्हय़ाला 55 हजार 7क्क् मेट्रिक टन युरिया अपेक्षित होता. येथेही केवळ 32 हजार 583 मेट्रिक टन युरियाच उपलब्ध झाला आहे. या जिल्हय़ात 23 हजार मेट्रिक टन युरिया खताचा तुटवडा आहे.
विभागाला आतार्पयत 83.41 टक्के युरिया खताचा साठा उपलब्ध झाला असून, या खताचे व्यवस्थित वितरण करण्यात आले आहे. उर्वरित साठा लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे अमरावतीचे बियाणो व खते, तंत्र अधिकारी बी.एच. इंधाने यांनी सांगितले.
जिल्हा उपलब्ध साठा गरज (मे.ट़)
अकोला11,82819,4क्क्
बुलडाणा 32,58355,7क्क्
वाशिम 14,4क्915,1क्क्
यवतमाळ 55,9क्क्61,189
अमरावती 26,62129,7क्क्