‘पनामा’तील ३०० कामगारांना कावीळ?

By Admin | Updated: June 30, 2016 03:15 IST2016-06-30T03:15:04+5:302016-06-30T03:15:04+5:30

पनामा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ३०० कामगारांना कावीळची लागण झाली

300 laborers in Panamachi jawala? | ‘पनामा’तील ३०० कामगारांना कावीळ?

‘पनामा’तील ३०० कामगारांना कावीळ?


ठाणे : पनामा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ३०० कामगारांना कावीळची लागण झाली आहे. या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ही रोगराई पसरली असल्याने या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी विद्युत मेटॅलिक्स एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस शशिकांत शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे.
ठाणे शहरात अस्तित्वात असलेल्या मोठ्या कंपन्यांपैकी विद्युत मेटॅलिक्स ही एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुमारे १ हजार ३०० कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी कंपनीने पाण्यासाठी काही टाक्या बसवल्या आहेत. मात्र, त्या अनेक वर्षांपासून साफच केलेल्या नाहीत. त्यामुळे हे पाणी प्यायलेल्या कर्मचाऱ्यांना कावीळ आणि इतर आजारांनी ग्रासले आहे. त्यापैकी अनेक कर्मचारी कामगार हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी ठिकाणी उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
सुपरमॅक्स पर्सनल केअर या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, या व्यवस्थापनानेच कर्मचाऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे हा प्रकार घडला. या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी अन्न आणि औषध प्रशासन, ठाणे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: 300 laborers in Panamachi jawala?