पपयांमध्ये सापडले ३० कोटींचे ‘मेओ मेओ’

By Admin | Updated: February 23, 2015 02:50 IST2015-02-23T02:50:08+5:302015-02-23T02:50:08+5:30

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथून आलेल्या फळांच्या एका ट्रकमध्ये लपवून आणलेले ५०० किलो मेफेड्रॉन पकडून केंद्रीय वित्त

30 million 'meo meo' found in papal | पपयांमध्ये सापडले ३० कोटींचे ‘मेओ मेओ’

पपयांमध्ये सापडले ३० कोटींचे ‘मेओ मेओ’

नवी दिल्ली : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथून आलेल्या फळांच्या एका ट्रकमध्ये लपवून आणलेले ५०० किलो मेफेड्रॉन पकडून केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरई) महाराष्ट्रातून चालविल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे.
मेफेड्रॉनला हा अमली पर्दाथ ‘मेओ मेओ’ या नावानेही ओळखला जातो. भारतात या अमली पदाथाची मागणी अलीकडच्या काळात वाढली आहे. दिल्लीत पकडलेल्या मेफेड्रॉनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे.
‘डीआरई’मधील सूत्रांनुसार हे मेफेड्रॉन सोलापूर जिल्हयातीलच एका अवैध कारखान्यात तयार केले गेले होते. या संदर्भात माहिती मिलाल्यानंतर कुर्डुवाडीहून फळे घेऊन रवाना झालेल्या या ट्रकवर अधिकारी नजर ठेवून होते. ट्रक दिल्लीला पोहोचताच त्याची तपासणी करण्यात आली. ट्रकमधील पपयांमध्ये एकूण ५०० किलो वजनाची मेफेड्रॉनची १३ पाकिटे मिळाली. मेफेड्रॉन तस्करीचा देशात आजवर पकडलेला हा सर्वात मोठा साठा असून ते पाश्चात्य देशांमध्ये पाठविण्यासाठी दिल्लीत धाडण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रक चालक व त्याच्या साथीदारास अटक करून साकेत न्यायालयात सादर केले आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदविले जात असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मेफेड्रॉन तस्करीचे मोठे रॅकेट उघड होईल, अशी शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 30 million 'meo meo' found in papal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.