माटुंग्यात ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
By Admin | Updated: December 10, 2014 11:11 IST2014-12-10T10:28:36+5:302014-12-10T11:11:17+5:30
मुंबईतील माटुंगा येथे अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

माटुंग्यात ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - देशात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढच होताना दिसत असून मुंबईतील माटुंगा येथे अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. माटुंग्यातील कामगार वस्तीत राहणारी ही चिमुरडी काल घरात झोपली होती, तिची आी कामासाठी बाहेर गेली होती. याचाच फायदा घेून नराधम आरोपी तिच्या घरात घुसला व त्याने त्या बालिकेवर अत्याचार केला व तेथून पळून गेला. संध्याकाळी त्या मुलीची आई घरी परत आल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला व तिने पोलिसांत तक्रार केली. या चिमुरडीवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान याप्रकरणी शाहुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्या नराधम आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.