शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

राज्यात पुराने घेतले १४४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:22 IST

१५४ कोटींची मदत; मुख्य सचिवांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई : महाराष्ट्रात जून ते ९ ऑगस्टपर्यंत ७८२ मि. मी. म्हणजे सरासरीच्या १०९ टक्के पाऊस झाला असून पुरामुळे आतापर्यंत १४४ जणांचे बळी गेले. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १५४ कोटी रुपये वितरित केले असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.पूरग्रस्तांना दिलेला निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरमध्ये सर्पदंशावरील १७ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या २० लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. ३० लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांची व्यवस्था केल्याचेही मेहता यांनी सांगितले.चार ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे सरासरीच्या १२४ टक्के तर सांगलीमध्ये सरासरीच्या २२३ टक्के आणि साताºयात सरासरीच्या १८१ टक्के पाऊस झाला. पुरामुळे सांगलीतील ९० आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २३९ गावे बाधित झाली आहेत. प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ८१३ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणची ३२ पथके कोल्हापूर, ८ पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. आवश्यक तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे मेहता यांनी सांगितले.एक लाख हेक्टरचे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर शेतीची जमीन बाधित झाली आहे. त्याची जिरायत, बागायती, फळबाग अशी फोड करण्यात येईल. पाणी ओसरल्यावर पीक विम्यापोटी नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणासाठी वीमा कंपन्यांना निर्देश देण्यात आले असून पिकाचे नुकसान त्याचे पंचनामे करण्याचेही निर्देश दिले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ मिळू शकेल. आपत्तीग्रस्त नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना १५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर