रुग्णवाहिकेत तीन हजार बालकांचा जन्म !

By Admin | Updated: May 7, 2015 03:12 IST2015-05-07T03:12:08+5:302015-05-07T03:12:08+5:30

‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या माध्यमातून सुसज्ज रुग्णवाहिकेतच दोन हजार ९१३ बालकांचा जन्म झाला आहे.

3 thousand babies born in ambulance! | रुग्णवाहिकेत तीन हजार बालकांचा जन्म !

रुग्णवाहिकेत तीन हजार बालकांचा जन्म !

पुणे : दुर्गम भाग, खेड्यापाड्यातील गर्भवती महिलांची प्रसुती सुखरूप होण्याचे प्रमाण राज्यात वाढले असून राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या माध्यमातून सुसज्ज रुग्णवाहिकेतच दोन हजार ९१३ बालकांचा जन्म झाला आहे.
अत्यावश्यक सेवेचा गेल्या सव्वा वर्षांत तब्बल २ लाख ६८ हजार ४९७ रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यात ८२१ अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा रुग्णवाहिकेतच मिळाल्याने त्यांचे जीव वाचल्याचे ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे मुख्य अधिकारी डॉ. शेळके यांनी सांगितले.

Web Title: 3 thousand babies born in ambulance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.