कंबरदुखीमुळे हृतिक बदलतोय ३ कार
By Admin | Updated: May 7, 2014 23:25 IST2014-05-07T23:25:42+5:302014-05-07T23:25:42+5:30
हृतिक सध्या कंबरदुखीमुळे त्रस्त आहे. सध्या त्याची ही समस्या एवढी वाढली आहे की, प्रवासादरम्यान त्याला तीन तीन कार बदलाव्या लागतात.

कंबरदुखीमुळे हृतिक बदलतोय ३ कार
सिद्धार्थ आनंदच्या ‘बँग बँग’च्या शूटिंगमधील अडचणी वाढत आहेत. यावेळी त्यामागचे कारण चित्रपटाचा हीरो हृतिक रोशन आहे. हृतिक रोशनच्या खासगी समस्या शूटिंगच्या आड येत आहेत. हृतिक सध्या कंबरदुखीमुळे त्रस्त आहे. सध्या त्याची ही समस्या एवढी वाढली आहे की, प्रवासादरम्यान त्याला तीन तीन कार बदलाव्या लागतात. ‘बँग बँग’ टीमच्या एका सूत्रांनसार हृतिक एकाच स्थितीत जास्त वेळ बसू शकत नाही. त्यामुळे शूटिंग लोकेशन्सवर पोहोचण्यासाठी त्याला तीन कार बदलाव्या लागतात. या तीनही कारच्या सीट्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हृतिकच्या या समस्येमुळे तो लोकेशनवर उशिरा पोहोचतो; पण त्याबाबत कुणाची काही तक्रार नाही.