शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 07:34 IST

सगळे झोपले की जायचो, सगळे उठायच्या आधी यायचो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडला बंडाचा प्रवास

मुंबई : सगळे झोपायचे तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि सगळे उठण्याच्या आधीच परत यायचो, हा कार्यक्रम एका दिवसात झालेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर नाट्याचा पट सोमवारी विधानसभेत उलगडला.

ते म्हणाले, की मी मुख्यमंत्री झालो आहे याचा विश्वास मला अजूनही वाटत नाही. सत्तापक्षात असलेले ५० आमदार बाहेर पडून विरोधी पक्षासोबत गेले. नऊ मंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदे दाव्यावर लावली. विधानपरिषद निवडणुकीनंतर मी  विधानभवनातून निघालो. आदल्या दिवशी मी विचलित होतो. त्या निवडणुकीत मला वाईट वागणूक दिली गेली. हा काय करू शकतो, असे माझ्याशी वागले. दोन्ही बाजूंच्या आमदारांना हे ठाऊक आहे. पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अन्यायाविरुद्ध उठाव केला पाहिजे; मी केला.

मी उठावासाठी निघालो तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन सुरू झाले. म्हणाले कुठे चाललात? मी त्यांना सांगितले मला माहिती नाही. माझ्यासोबतच्या एकाही आमदाराने आपण कुठे जात आहोत, काय करणार आहोत हे मला विचारले नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना ते माहिती आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी  लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही, असा निर्धार करून निघालो. सोबत असलेल्या आमदारांना एवढाच विश्वास दिला की, तुमचे नुकसान होऊ देणार नाही. तुमचे नुकसान होत आहे असे लक्षात येईल त्या क्षणी या जगाचा निरोप घेऊन निघून जाईल, असे सांगताना शिंदे भावुक झाले. 

आणखी तीन-चार आमदार येणार असल्याचा दावाशिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात केवळ १५ आमदार उरले असताना त्यातील आणखी तीनचार आमदार आपल्यासोबत येतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की संतोष बांगर काल रात्री माझ्याकडे आले. आणखी तीन-चार जण यायला तयार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मी कोणालाही जबरदस्तीने, बंदूक लावून आणले नाही.

सत्तांतराच्या नाट्यातील सर्वांत मोठे कलाकार हे देवेंद्र फडणवीसच होते. सगळे काही घडविणारे हे आहेत, कधी काय करतील याचा नेम नाही, असेही शिंदे म्हणाले. तसेच, पुढे भाषणात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा संदर्भ देत असतानाच शिंदे यांच्याकडे पाहत ‘सगळे काही सांगून टाकू नका’ असे फडणवीस म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे