शिक्षकाने साकारले २ कि.मी.कॅनव्हासवर पेंटिंग!

By Admin | Updated: March 23, 2015 01:19 IST2015-03-23T01:19:56+5:302015-03-23T01:19:56+5:30

तब्बल दोन हजार मीटर कॅनव्हास कापडावर जगविख्यात खजुराहो मंदिराच्या ५०० मूर्ती व नक्षीकाम रेखाटण्याची किमया नशिराबाद येथील श्याम पुंडलिक कुमावत या शिक्षकाने केली आहे.

2km Kanvas painting done by the teacher! | शिक्षकाने साकारले २ कि.मी.कॅनव्हासवर पेंटिंग!

शिक्षकाने साकारले २ कि.मी.कॅनव्हासवर पेंटिंग!

सुनील पाटील ल्ल जळगाव
तब्बल दोन हजार मीटर कॅनव्हास कापडावर जगविख्यात खजुराहो मंदिराच्या ५०० मूर्ती व नक्षीकाम रेखाटण्याची किमया नशिराबाद येथील श्याम पुंडलिक कुमावत या शिक्षकाने केली आहे. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ संस्थेकडून लवकरच त्यासंदर्भातील माहिती पाठवून जागतिक विक्रमासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुमावत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याआधी ६५५ मीटर लांबीच्या पेटिंगची नोंद झाली आहे. कुमावत यांनी एक महिना रजा घेऊम हे चित्र साकारले. मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील सर्व देवदेवता, अप्सरा, नक्षीकाम यांसह सर्व तपशिलांचा चित्रात समावेश आहे. कुमावत यांचे ३ मार्चपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली दररोज दिवसातील १४ ते १५ तास सतत काम सुरू असते. २४ मार्च रोजी त्यांचे रेखाटन संपणार आहे. रेखाटनाचे संपूर्ण चित्रिकरण, फोटो व पुराव्यांसह ते अर्ज करणार आहेत. त्यासाठी त्यांची आधीच संस्थेकडे नोंदणी झाली आहे.

Web Title: 2km Kanvas painting done by the teacher!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.