288 जागा लढविणार
By Admin | Updated: July 25, 2014 02:57 IST2014-07-25T02:57:33+5:302014-07-25T02:57:33+5:30
विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे सर्व 288 जागा लढेल. कोणाशी दोस्ती वगैरे होणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

288 जागा लढविणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे सर्व 288 जागा लढेल. कोणाशी दोस्ती वगैरे होणार नाही, असा फैसला सुनावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 10 दिवसांत राज्याच्या पुढील 50 वर्षाच्या नियोजनबद्ध विकासाची ब्ल्यू प्रिंट राज्यासमोर ठेवेन. तसेच आठ-दहा दिवसांत राज्यभर झंझावाती दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले.
मनसेच्या प्रदेश पदाधिका:यांचा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात झाला. या वेळी ते म्हणाले की, मोदी लाटेत सेनेचे खासदार निवडून आले. लाटेत त्यांनाही आंघोळ घडली. जिंकताच त्यांना सगळे गुलाबी दिसत होते, आता त्यांचा रंग जांभळा झाला आहे, थोडय़ाच दिवसांत तो काळा पडेल! राज यांच्या भाषणाच्या वेळी व्यासपीठावर कोणीही नेता नव्हता. राज यांच्यासाठीही खुर्ची ठेवलेली नव्हती. काही कार्यकर्ते धमक्या देऊन वसुली करीत असल्याचे आपल्या कानावर आहे. हे धंदे बंद करा, लोकांचे प्रश्न सोडवा, अशा कानपिचक्या त्यानी दिल्या.
राज्यात दंगली उफाळतील
निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जातीय दंगली उफाळण्याची भीती राज यांनी व्यक्त केली. दंगली पसरविणा:या प्रवृत्तींपासून सावध राहा. दंगली पसरविणारे कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना थारा देऊ नका, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
फेरीवाला धोरणाला विरोध
मुंबई, ठाण्यातील फेरीवाला सर्वेक्षण म्हणजे परप्रांतीय व्होटबँक वाढविण्याचा प्रय} आहे. शहरे बकाल करण्याच्या या धोरणाला मनसे तीव्र विरोध करेल. फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध करतानाच फुटपाथ चालण्यासाठी असतात की फेरीवाल्यांसाठी, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.