बजेटमध्ये पर्यटनासाठी २८५ कोटी
By Admin | Updated: March 19, 2016 01:46 IST2016-03-19T01:46:14+5:302016-03-19T01:46:14+5:30
राज्याच्या नवीन पर्यटन धोरणासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याला

बजेटमध्ये पर्यटनासाठी २८५ कोटी
मुंबई : राज्याच्या नवीन पर्यटन धोरणासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करताना वित्तमंत्र्यांनी येथील दुर्लक्षित असलेल्या पर्यटनस्थळांना उभारी देण्याचे काम केले आहे.
औरंगाबादमधील म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद आणि सुलीभंजन या पर्यटन स्थळांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची घोषणा त्यांनी केली. शिवाय निसर्ग पर्यटनासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या संरक्षित क्षेत्रांत तसेच इतर वनक्षेत्रांत विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी ४७ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
नवीन पर्यटन धोरणामुळे पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)