- संतोष हिरेमठऔरंगाबाद : गेल्या वर्षभरात एकट्या घाटी शासकीय रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. तसेच ८ तिळे बालकही येथे जन्मले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग सर्वाधिक व्यस्त आणि गर्दीचा म्हणून ओळखला जातो.या ठिकाणी दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. प्रसूतीसाठी जिल्हाभरातून गरोदरमाता घाटीत दाखल होतात. गेल्या वर्षभरात या ठिकाणी तब्बल १७ हजार ९३७ प्रसूती झाल्या. यामध्ये ९ हजार १२० मुले, तर ८ हजार ४४८ मुलींचा जन्म झाला. विशेष म्हणजे वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला, तर ८ तिळेही जन्मले.
वर्षभरात जन्मले २७३ जुळे, ८ तिळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 04:52 IST