मुंबईत २,७०२ अनधिकृत मोबाइल टॉवर - लोकलेखा
By Admin | Updated: April 6, 2016 05:04 IST2016-04-06T05:04:26+5:302016-04-06T05:04:26+5:30
बईत विविध मोबाइल कंपन्यांनी सुमारे २,७०२ अनधिकृत मोबाइल टॉवर महापालिकेची परवानगी न घेता परस्पर उभारले

मुंबईत २,७०२ अनधिकृत मोबाइल टॉवर - लोकलेखा
मुंबई : मुंबईत विविध मोबाइल कंपन्यांनी सुमारे २,७०२ अनधिकृत मोबाइल टॉवर महापालिकेची परवानगी न घेता परस्पर उभारले. त्यामुळे महापालिकेचे साडेसहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका विधानसभेच्या लोकलेखा समितीने ठेवला. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी समितीचा अहवाल आज सभागृहात सादर केला. मोबाइल टॉवर्सना परवानगी देताना कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या, याची माहिती एक महिन्यात द्यावी, असे निर्देशही समितीने सरकारला दिले आहेत. (विशेष प्रतिनिधी)