जिल्हा पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड

By Admin | Updated: September 5, 2016 01:34 IST2016-09-05T01:34:26+5:302016-09-05T01:34:26+5:30

जिल्हा परिषदेतर्फे शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड झाली आहे.

27 teachers selected for the district award | जिल्हा पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड

जिल्हा पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड


पुणे : जिल्हा परिषदेतर्फे शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी २७ शिक्षकांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते सोमवारी (दि ५) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हा निवड समितीची स्थापना करण्यात आली होती.
या पुरस्काराच्या निवडीसाठी राष्ट्रीय तसेच राज्य पुरस्काराच्या निकषांचा विचार केला जातो. पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे : प्रमिला बोऱ्हाडे (शिंगवे, आंबेगाव), प्रमिला केरभाऊ बोऱ्हाडे (शिंगवे, ता. आंबेगाव), विकास कानडे (महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव), सुभाष दगडे, (चौधरवाडी, ता. बारामती), स्वाती गदादे, (ढवाणवस्ती, ता. बारामती), सुनील नलावडे, (शिवरे, ता. भोर), प्रवीण बदक, (संगमनेर, ता. भोर), सुनील चव्हाण, (घोलेवस्ती, ता. दौंड), नारायण शेंडे, (लडकतवाडी, ता. दौंड), अर्चना दळवी, (बहुली, ता. हवेली), रतन टिळेकर, (नायगाव, ता. हवेली), वंदना मंडलिक (चिंदादेवी, ता. इंदापूर), राजेंद्र भोंग (रामकुंड, ता. इंदापूर), सुशीला डुंबर (माळवाडी, ता. जुन्नर), संतोष पन्हाळे (खामुंडी, ता. जुन्नर), सुभाष दाते (नळावणे, ता. जुन्नर), नंदकुमार वाघमारे (सतारकावस्ती, ता. खेड), वैशाली घुमटकर (चाकण क्र. २, ता. खेड), शोभा वहिले (कान्हे, ता. मावळ), गणेश चासकर (टाकवे बु., ता. मुळशी), रमेश मारणे, (धुमाळ देवकरवाडी, ता. मुळशी), मच्छिंद्र कोलते (पठारवाडी, ता. पुरंदर), सविता शितोळे (यादववाडी, ता. पुरंदर), आशा सकट (तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर), आशा खोमणे (टाकळी हाजी, ता. शिरूर), राखी गलांडे (रांजणे, ता. वेल्हे), रवींद्र कुंभार (तिडकेवाडी, ता. वेल्हे). (प्रतिनिधी)
>या वर्षी या पुरस्कारासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच उपशिक्षक असे एकूण ६७ शिक्षकांचे प्रस्थाव आले होते. या पैकी २७ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी विस्तार अधिकारी आणि आणि गटशिक्षणाधिकारी यांनी समक्ष शाळेवर जाऊन पाहणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून १ जिल्हा पुरस्कार तर एक प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला आहे.

Web Title: 27 teachers selected for the district award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.