२७ महाविद्यालयांचा स्वायत्तता घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 02:01 IST2016-10-20T02:01:46+5:302016-10-20T02:01:46+5:30

मुंबई विद्यापीठाच्या कामाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांची संख्या ७५२ इतकी झाली

27 refuses to take autonomy of colleges | २७ महाविद्यालयांचा स्वायत्तता घेण्यास नकार

२७ महाविद्यालयांचा स्वायत्तता घेण्यास नकार


मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कामाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांची संख्या ७५२ इतकी झाली आहे. असे असले तरी ‘नॅक’ मूल्यांकनात पात्र ठरलेल्या २७ महाविद्यालयांनी अजूनही स्वायत्तता स्वीकारण्यास नकार दिला आहे.
कामाचा व्याप आणि कमी पगाराची भीती शिक्षक कर्मचाऱ्यांना सतावत असून यामुळे विद्यापीठाच्या कारभाराचा डोलारा सांभाळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. महाविद्यालयांना स्वबळावर
विकास करता यावा, यासाठी केंद्रीय स्तरावर स्वायत्तता बहाल करण्यात येते. यासाठी महाविद्यालयांचे
‘नॅक’ मूल्यांकनासाठी सर्वेक्षण
केले जाते आणि मिळालेल्या गुणानुसार ग्रेड दिली जाते. यामध्ये सलग तीन वेळा ‘ए प्लस’ ग्रेड मिळवलेल्या महाविद्यालयांना यूजीसीकडे केवळ अर्ज केला तरी स्वायत्तता मिळू शकते. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली
एकूण २७ महाविद्यालये नॅक मूल्यांकनात सरस ठरूनही स्वायत्तता घेण्यास तयार नाहीत. स्वायत्तता देताना यूजीसीकडून पहिली पाच वर्षे अभ्यासक्रम तयार करून परीक्षा घेणे, निकाल लावणे अशी कामे दिली जातात. यामध्ये महाविद्यालय प्रशासन यशस्वी झाल्यास आर्थिक जबाबदारीही कॉलेज प्रशासनावर सोपविण्यात येते.
मात्र यामुळे व्यवस्थापनाची मुजोरी वाढेल आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांचा पगार कमी होईल, अशी भीती शिक्षक-कर्मचाऱ्यांना वाटते. यामुळेच स्वायत्ततेला विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 27 refuses to take autonomy of colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.