२७ कोटींचे मँड्रेक्स जप्त

By Admin | Updated: May 21, 2016 04:00 IST2016-05-21T04:00:30+5:302016-05-21T04:00:30+5:30

या तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत २७ कोटी ५० लाख चा मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा साठा गुरूवारी जप्त केला.

27 crore mandrex seized | २७ कोटींचे मँड्रेक्स जप्त

२७ कोटींचे मँड्रेक्स जप्त


वाडा : या तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत २७ कोटी ५० लाख चा मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा साठा गुरूवारी जप्त केला.
तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीतील फार्म हाऊस वरील एका बंगल्यात मेथॅक्लोन (मँड्रेक्स) या अंमली पदार्थाचा साठा ठेवला असल्याची माहिती पालघरच्या पोलीसअधिक्षिका शारदा राऊत यांना मिळाली असता त्यांनी गुन्हे शाखा पालघर, वाडा पोलीस तसेच एटीएस गुजरात यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली असता त्याने मँड्रेक्स या अंमली पदार्थाची ५५० किलो पावडर हस्तगत केली तीची किंमत अंतराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे २७ कोटी ५० लाख आहे. तसेच ते बनविण्यासाठी लागणारे केमिकल,अ‍ॅसीड, कच्चा माल इत्यादी मालही हस्तगत केला आहे. या प्रकरणी संशयीत म्हणून विवेकानंद कुबल तसेच आणखी एका इसमांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: 27 crore mandrex seized