२६ जानेवारीची परेड शिवाजी पार्कवर

By Admin | Updated: December 23, 2014 03:23 IST2014-12-23T03:23:46+5:302014-12-23T03:23:46+5:30

लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळ्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची परेड

On 26th January Parade Shivaji Park | २६ जानेवारीची परेड शिवाजी पार्कवर

२६ जानेवारीची परेड शिवाजी पार्कवर

अतुल कुलकर्णी, मुंबई
लहान मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळ्यांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणारी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची परेड या वर्षी मरिन ड्राइव्हवर होणार नाही! मुंबई पोलिसांनी आधी सुरक्षेचे कारण देत या परेडला नकार दिला होता, मात्र ते कारण दिले तर टीकेची झोड उठेल म्हणून मुंबई महापालिकेने या भागात रस्त्याची कामे काढल्याने ही परेड शिवाजी पार्कवर होईल, असे कारण आता पुढे केले आहे.
गेल्या वर्षी ही परेड करताना त्यात रणगाडे, तोफांसह मिल्ट्री सहभागी होणार हे लक्षात आल्यानंतर परेडचे नेतृत्व कोणी करायचे, यावरून वाद घातला गेला. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आणि मंत्री सुरेश शेट्टी यांनी परेड मरिन ड्राइव्हवरच होईल, अशी ठाम भूमिका घेतली होती. परेडचे नेतृत्व देखील आर्मीने केले. २६ जानेवारीच्या परेडला कधीही गर्दी होत नव्हती, पण गेल्यावर्षी लाखो लोक या परेडमध्ये सहभागी झाले. माध्यमांनीदेखील या परेडला थेट प्रक्षेपणाद्वारे जगभर नेले. या वर्षी सरकार बदलले आणि मुंबई पोलिसांनी बंदोबस्ताचे कारण दाखवत आधी ही परेड मरिन ड्राइव्हवर नको, अशी भूमिका घेतली होती. पण त्यामागे खरे कारण परेडचे नेतृत्व कोणी करायचे हेच होते. मिल्ट्रीच्या नेतृत्वाखाली न जाण्याच्या हट्टापोटी या वर्षीची परेड रद्द करण्यासाठीची लेखी पत्रे दिली गेली. नागपुरात यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यात मरिन ड्राइव्हवर खड्डे पडले आहेत, रस्त्याची कामे चालू आहेत, अशी कारणे दिली गेली.

Web Title: On 26th January Parade Shivaji Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.