साखर कारखान्यांकडून २,५२५ कोटींची थकबाकी
By Admin | Updated: February 24, 2015 02:05 IST2015-02-24T02:05:33+5:302015-02-24T02:05:33+5:30
राज्यात रविवारपर्यंत ६३५ लाख टन उसाचे गाळप झाले असून सुमारे ७० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाच्या एकूण रकमे

साखर कारखान्यांकडून २,५२५ कोटींची थकबाकी
पुणे : राज्यात रविवारपर्यंत ६३५ लाख टन उसाचे गाळप झाले असून सुमारे ७० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाच्या एकूण रकमेपैकी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वाजवी व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) २,५२५ कोटी रुपये देणे बाकी आहे. राज्याचे साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी सहकार विभाग चिंतन बैठकीत ही माहिती दिली.
डॉ. शर्मा म्हणाले, गाळप झालेल्या ६३५ लाख मेट्रिक टन उसाची एफआरपीनुसार रक्कम १०,१८५ कोटी रुपये होते. यापैकी कारखान्यांनी ७,६६० कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत असून ४४ कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला आहे. एफआरपी आणि प्रत्यक्षात दिलेला दर यात ४०० रुपयांपेक्षा जास्त तफावत असणारे ४० कारखाने आहेत. पुढील आठवड्यापासून त्यांची सुनावणी घेण्यात येईल. (प्रतिनिधी)