आदिवासी वसतिगृहासाठी २५00 विद्यार्थी ‘वेटिंग’वर

By Admin | Updated: October 3, 2015 03:42 IST2015-10-03T03:42:07+5:302015-10-03T03:42:07+5:30

शासकीय वसतिगृहांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याची ओरड होत असली तरी, येथे प्रवेश घेण्यासाठी यंदा तब्बल अडीच हजार विद्यार्थी ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत

2500 students 'waiting' for tribal hostel | आदिवासी वसतिगृहासाठी २५00 विद्यार्थी ‘वेटिंग’वर

आदिवासी वसतिगृहासाठी २५00 विद्यार्थी ‘वेटिंग’वर

अविनाश साबापुरे, यवतमाळ
शासकीय वसतिगृहांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याची ओरड होत असली तरी, येथे प्रवेश घेण्यासाठी यंदा तब्बल अडीच हजार विद्यार्थी ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. जवळपास अर्धे शैक्षणिक सत्र आटोपल्यानंतर या विद्यार्थ्यांना वसतिगृहात सामावून घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील २६ एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांत २०१५-१६ या सत्राकरिता हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील जवळपास २ हजार ४४४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नाहीत. गरीब घरातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहून शिकण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे त्यातील अनेकांनी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागापर्यंत पाठपुरावा केला. शासनाने या विद्यार्थ्यांना ‘खास बाब’ म्हणून त्यांच्या महाविद्यालयाच्या परिसरातील वसतिगृहात सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एखाद्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता संपली असल्यास त्या भागातील विद्यार्थ्यांना जवळपासच्या दुसऱ्या वसतिगृहात सामावून घेण्याचीही सूचना आहे.

Web Title: 2500 students 'waiting' for tribal hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.