ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. ५ : तालुक्यातील बोरी ते देपूळ या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पूस नदीवरील नविन पुलाच्या रखडलेल्या कामामुळे खोलगट भागात असलेल्या जुन्या पुलावरुन २५० शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना आपल्या कामासाठी मार्गक्रमण करावे लागत आहे. गत तीन दिवसांपासून जोरदार झालेल्या पावसाने ४ ते ५ फूट उंची पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतीतील कामांवर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पाचे काम लघु पाटबंधारे योजना विभाग क्रमांक तीनच्या अधिपत्याखाली झाले. येथून जाणारा नविन पुलाचे उंची वाढवून काम सुरु आहे हे अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे परिसरातील गावातील लोकांना जुन्या पुलावरुनचं मार्गक्रमण करावे लागते. सद्यस्थितीत जुना पुलाच्यावरुन ४ ते ५ फूट पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी व नागरिकांनाही बाहेरगावी जाण्यासाठी या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पूस नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.