शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपामुळे बुडाले कर्मचाऱ्यांचे २५० कोटी; आंदोलन लांबले, प्रत्येकी दीड ते चार लाखांचे नुकसान

By नितीन जगताप | Updated: April 14, 2022 05:33 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपर्यंत लांबल्याने, वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून ते कर्जबाजारी झाले आहेत.

नितीन जगतापमुंबई :

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यांपर्यंत लांबल्याने, वेतनाअभावी कर्जाचे हप्ते थकून ते कर्जबाजारी झाले आहेत. विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक ते चार लाखांचा फटका बसला, अशी माहिती कामगार वर्तुळातील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

अनेक कर्मचाऱ्यांचे वर्षातील २४० हजेरी दिवस पूर्ण होत नसल्याने, त्यांना या वर्षीची ग्रॅच्युएटी मिळणार नाही, तसेच त्यांच्या पीएफ खात्यात पाच महिन्यांचे व्याज जमा होणार नाही. विमा पॉलिसीचे हप्ते थकले आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितले की,  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू  झालो.  मला ५५ हजार रुपये वेतन आहे, पण संपामुळे २.५० लाख रुपयांचे नुकसान झाले. मला खर्चासाठी मित्रांकडून उसनवारी करावी लागली.

४०,२१९ कर्मचारी कामावर हजर- न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी रुजू होत असून, बुधवारपर्यंत ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ४० हजार २१९ कर्मचारी उपस्थित होते, अद्यापही ४१ हजार ४६४ जण संपात सहभागी आहेत. - ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

"मी २०१९ मध्ये एसटी बँकेतून ५ लाखांचे कर्ज घेतले. मला १०,५०० रुपयांचा हप्ता आहे, पण मी पाच महिन्यांपासून संपात  असल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत."    - एसटी कर्मचारी "न्यायालयाच्या निर्णयाने मान्य झालेल्या मागण्या पूर्वीच परिवहनमंत्री अनिल परब यांनी मान्य केल्या आहेत. या आंदोलनात कर्मचाऱ्यांना खूप मोठी आर्थिक झळ बसणार आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून काहीतरी आर्थिक साहाय्य होईल, असा मार्ग निघाला पाहिजे."    - श्रीरंग बरगे, सरचिटणीस,     महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस.

कष्टकऱ्यांचे दीड ते दोन कोटी गेले कुठे?- संपातील एसटी कर्मचाऱ्यांकडून अंदाजे दीड ते दोन कोटींची रक्कम जमा करण्यात आली. - यामध्ये कारवाई झालेल्या ११ हजार कर्मचाऱ्यांकडून ५००, तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये घेण्यात आले. - त्यांची संख्या ४० हजारांहून अधिक आहेत. ती रक्कम दीड ते दोन कोटींहून अधिक असून हे पैसे गेले कुठे, असा  सवाल एका एसटी कर्मचाऱ्याने विचारला.

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र