शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

महाविकास आघाडी सतर्क, नाराज आमदारांवर ‘वॉच’; भाजपाच्या दाव्यानंतर राजकीय हालचाल वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:46 IST

सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

अल्पेश करकरे

मुंबई - राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार  पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी तिन्ही पक्षाकडून सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आश्वस्त करण्यात येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे मोहरे फोडून दाखवा असं विरोधी पक्षाला आव्हान केलं होतं. ते आव्हान  केंद्रीय मंत्री व भाजपा वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosahe Danve) यांनी स्वीकारलं असल्याचे चर्चा आहे. कारण रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलंय.

उद्धव ठाकरेंनी विरोधकांना काय आव्हान दिले होते?

सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं, ते पिलू वळवळ करत होतं, आता फुत्कारत आहे, असं म्हणत भाजपला उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. महाराष्ट्र सरकार पडणार नाही. आपले १७० आमदार आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) ३ मार्च रोजी मुंबईत बोलताना व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. परंतु माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना केलं होतं. तसेच ते तुमची गुमालगिरी करणार नाहीत, असं ही त्यांनी म्हटलं होतं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान केलं होतं.

रावसाहेब दानवे यांनी काय गौप्यस्फोट केला ?

भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे."महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या(BJP) वाघोरीत येऊन पडतील" असं धक्कादायक विधान दानवे यांनी केलं आहे. दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी २५ आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. "जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत" असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला.

कोण नाराज चाचपणी सुरू ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट या पार्श्वभूमीवर  खरच त्यांच्या वक्तव्यानुसार आमदार फोडले तर नाही ना.. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षश्रेष्ठी आपल्या आमदारांची फोन करून विचारपूस करत असल्याची चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांचा हा दावा खरा की खोटा, पण त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची चिंता वाढली आहे. सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का? याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या दाव्यामुळे सरकार धास्तावले

यापूर्वीही अनेकदा भाजप नेत्यांकडून सरकार पडणार अशी अनेक वक्तव्य आपण वारंवार ऐकली आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सरकारला अनेक मुद्द्यांवर विरोधक कोंडीत पकडताना दिसत आहेत . त्यामुळे सरकार कुठेतरी अनेक मुद्यांवरून डगमगलेले असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार विविध मुद्द्यांवरून  आपल्याच सरकारवर नाराज असल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सरकार धास्तावल्याचं देखील चर्चा आहे.

दानवे यांचा खरच गौप्यस्फोट की फक्त चर्चा ?

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच काही ना काही विषयांवरून चर्चेत असतात. त्यामध्ये नुकतच त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्यावरून राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र दुसरीकडे दानवे यांनी खरंच गौप्यस्फोट केलाय की फक्त चर्चा घडवण्यासाठी वक्तव्य केले असल्याची देखील चर्चा सुरू आहे. कारण अधिवेशन सुरू आहे, तसेच दुसरीकडे तीन दिवस होळी आणि सुट्ट्यांचा काळ आहे, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी तर हे विधान केलं नाही ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.त्यामुळे दानवे यांनी जो गौप्यस्फोट केलाय तो खरा की खोटा हे पुढील काळातच स्पष्ट होईल.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीraosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा