जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचे 25 लाख

By Admin | Updated: September 17, 2014 22:55 IST2014-09-17T22:55:57+5:302014-09-17T22:55:57+5:30

महाप्रलयामुळे संपूर्ण जनजीवन उद्धवस्त झालेल्या जम्मू-काश्मीरला मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

25 lakhs of Mumbai University for flood victims | जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचे 25 लाख

जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांना मुंबई विद्यापीठाचे 25 लाख

मुंबई : महाप्रलयामुळे संपूर्ण जनजीवन उद्धवस्त झालेल्या जम्मू-काश्मीरला मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीला 25 लाख रुपयांचे योगदान दिले असून, विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर यांनी राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांच्याकडे पंतप्रधान आपत्ती निवारण निधीसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पूरग्रस्त जम्मू-काश्मीरला मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी कुलगुरु राजन वेळूकर, प्र-कुलगुरु नरेश चंद्र, कुलसचिव एम. ए. खान आणि वित्त व लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन पंतप्रधान आपत्ती निवारण निधीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. काश्मीरमधील पूरग्रस्त जनतेच्या पुर्नवसनासाठी विद्यापीठाने दिलेल्या योगदानाचे राज्यपालांनी कौतुक केले. हा धनादेश बुधवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविण्यात आला. दरम्यान, यापूर्वी गारपीटग्रस्तांना मदत म्हणून मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व कर्मचा:यांचा एक दिवसाचा पगार दिला होता.
 
राज्यपाल विद्यासागर राव 
यांनी बुधवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु व प्र-कुलगुरूंची राज भवन येथे बैठक घेतली. 
राज्यातील विद्यापीठांचा लौकिक उत्तम असून तो आणखी वृद्धिंगत करणो ही आपल्या सर्वाची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी कुलगुरूंना सांगितले. 
सर्व कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठांची वैशिष्टय़पूर्ण माहिती तसेच विद्यापीठांनी हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांबदृल राज्यपालांना माहिती दिली.

 

Web Title: 25 lakhs of Mumbai University for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.