२५ बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार
By Admin | Updated: May 6, 2014 17:08 IST2014-05-06T17:07:09+5:302014-05-06T17:08:06+5:30
जालना : पेशवा युवा मंचच्या वतीने येथील पाठक मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी १०.३० वाजता २५ बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार करण्यात आले.

२५ बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार
जालना : पेशवा युवा मंचच्या वतीने येथील पाठक मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी १०.३० वाजता २५ बटूंवर सामूहिक उपनयन संस्कार करण्यात आले. यावेळी आशीर्वाद देण्यासाठी प.पु. माधवानंद महाराज उमरखेड, प.पु. भास्कर महाराज देशपांडे जाफराबाद, वे.शा.सं. रामदास शास्त्री आचार्य, ह.भ.प. नाना महाराज पोखरीकर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे, संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. बलवंत नाईक, प्रा. एस.व्ही. देशपांडे, डॉ. भारत कुलकर्णी, डॉ. प्रसाद कुलकर्णी, पेशवा युवा मंचचे अध्यक्ष महेश जोशी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मातृभोजन करून बटूंची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंगलाष्टाके आणि वाद्यांसह बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. यावेळी आर.आर. जोशी, अभय कुलकर्णी, डॉ. प्रकाश सिगेदार, बबलू सारस्वत, अॅड. सुरेश कुलकर्णी, सिद्धिविनायक मुळे, अतुल वझरकर, डॉ. माधवी अंबेकर, सुरेश मगरे, विकास मदाने, पी.जी. देशपांडे, डॉ. श्रीपाद देशपांडे, रमेश देहेडकर, प्रकाश आचार्य, श्रीकृष्ण जवळकर, किशोर तिवारी, सुरेश मुळे, श्रीकृष्ण टोणपे, डॉ. मकरंद बोठे, संतोष दाभाडकर, सुनंदा बदनापूरकर, शिवाजी जोशी, वंदना कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)