24 वर्षे, 25 न्यायालये.. खटला सुरूच..

By Admin | Updated: September 4, 2014 01:58 IST2014-09-04T01:58:49+5:302014-09-04T01:58:49+5:30

संपूर्ण राज्याच्या पोलीस आणि शासकीय यंत्रणोत खळबळ माजविणा:या 24 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा खटला 18 वर्षापासून सुरू असून] तो तब्बल 25 न्यायालये फिरला आहे.

24 years, 25 courts .. trial begins .. | 24 वर्षे, 25 न्यायालये.. खटला सुरूच..

24 वर्षे, 25 न्यायालये.. खटला सुरूच..

राहुल अवसरे - नागपूर
संपूर्ण राज्याच्या पोलीस आणि शासकीय यंत्रणोत खळबळ माजविणा:या 24 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा खटला 18 वर्षापासून सुरू असून] तो तब्बल 25 न्यायालये फिरला आहे. 
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील चांदी घोटाळ्याचा हा खटला आहे. सध्या हा खटला मिहान जमीन प्रकरणांच्या निपटा:यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयात सुरू असून] तेथे साक्षीपुरावे नोंदवण्यात येत आहे. 
जुलै 199क् मध्ये हे प्रकरण घडले. तब्बल सहा वर्षानी (4 डिसेंबर 1996 रोजी) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर त्यानंतर तीन वर्षानी म्हणजेच 2क् सप्टेंबर 1999पासून त्याची सुनावणी सुरू झाली होती. 
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, 1 जुलै 199क् रोजी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हनुमानसिंग राजपूत, अशोक चौधरी आणि त्यांच्या पथकाला केरळ एक्स्प्रेसमधून मोठय़ा प्रमाणावर चांदीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने ‘एस 5’ आणि ‘एस 6’ या दोन बोगींची झडती घेतली होती. त्यात मथुरा येथील रमेशचंद्र पन्नालाल शर्मा याच्याकडे प्रत्येकी 8क् किलो चांदीच्या 2 बॅगा आणि 1क्क् किलो चांदीची एक बॅग आढळली होती. 
हरिशंकर पूरणचंद वैश्य याच्याकडे 95 किलो चांदी असलेली एक बॅग आढळली होती. माखनलाल रामप्रकाश अग्रवाल याच्याकडे पाच कॅन्व्हास बॅग आढळल्या होत्या. त्यात 485 किलो चांदी होती. एकूण 84क् किलो चांदी या पथकाने जप्त केली होती.
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर अमरुळे यांनी 1 लाख, उपनिरीक्षक राजपूत यांनी 2क् हजार आणि चौधरी यांनी 3क् हजाराची लाच घेऊन 2क्6 किलो 956 ग्रॅम चांदी आरोपींजवळ ट्रान्ङिाट पास असल्याचे दाखवून सोडून दिली. उर्वरित 633 किलो 44 ग्रॅम चांदी सीताबर्डीच्या मालखान्यात ठेवण्यात आली होती.
ही चांदी त्यावेळच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका:याच्या न्यायालयाने आरोपी व्यापा:यांच्या सुपुर्द करण्याचा आदेश 23 जुलै 199क् रोजी दिला होता. परंतु आयकर अधिका:यांनी या आदेशावर स्थगनादेश आणला होता. मालखान्यातील चांदीला हळूहळू पाय फुटून संपूर्ण अस्सल चांदी बेपत्ता करून नकली चांदी मालखान्यात ठेवण्यात आली होती. 
एकूण सात बॅगमध्ये ही चांदी होती.  जप्तीनाम्यानुसार या 
चांदीचे वजन 633 किलो 44 
ग्रॅम एवढे  असावयास पाहिजे होते. परंतु प्रत्यक्षात ते 585 किलो  भरले होते.  घोटाळ्याचे हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. प्रारंभी खुद्द उपायुक्त पी. के. जैन यांनी तपास केला होता. त्यानंतर आयपीएस दर्जाचे सहायक पोलीस आयुक्त संजय बव्रे यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला होता.
 
च्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यात  तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर महादेव अमरूळे, तत्कालीन उपनिरीक्षक हनुमानसिंग बहादूरसिंग राजपूत आणि अशोक सदाशिव चौधरी  यांचा समावेश आहे. 
च्मालखान्यातील चांदी घोटाळा आणि लोकसेवकांनी केलेला भ्रष्टाचार, अशी दोन वेगवेगळी प्रकरणो न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 
च्चांदीची विल्हेवाट लावण्याचा आरोप असलेले सीताबर्डीच्या मराठा मंदिरचे मालक रमेश घेवरचंद मोहता यास चार वर्षापूर्वीच अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. तिवारी यांनी दोषमुक्त केले. 
 
च्प्रत्यक्ष चांदी बाळगणारे रमेशचंद्र पन्नालाल शर्मा, हरिशंकर पूरनचंद वैश्य आणि माखनलाल रामप्रकाश अग्रवाल सर्व रा. मथुरा उत्तर प्रदेश हे अद्यापही फरार आहेत.22
च्त्यावेळी जप्त चांदीची किंमत 5क् लाख 4क् हजार (प्रतिकिलो 6841 रुपये) होती. आता ही किंमत पाच-सहा कोटींच्या घरात (प्रतिकिलो 41, हजार 668 रुपये) आहे. या सर्व पायपट्टय़ा होत्या आणि त्या चेन्नईहून आणण्यात आल्या होत्या.

 

Web Title: 24 years, 25 courts .. trial begins ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.