आठवड्यात २४ हजार अर्ज कन्फर्म

By Admin | Updated: June 9, 2016 06:10 IST2016-06-09T06:10:18+5:302016-06-09T06:10:18+5:30

राज्यातील अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २ जूनपासून सुरूवात झाली

24 week application confirmation | आठवड्यात २४ हजार अर्ज कन्फर्म

आठवड्यात २४ हजार अर्ज कन्फर्म


मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेसाठीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २ जूनपासून सुरूवात झाली आहे. अवघ्या आठवड्याभरात २४ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केले आहेत. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक अर्ज मुंबई आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहेत.
गेल्यावर्षी उपलब्ध असलेल्या १ लाख ५३ हजार ८६७ जागांत यंदा १५ हजार १२६ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस असेल. बुधवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी अपूर्ण भरलेले, पूर्ण भरलेले आणि कन्फर्म केलेल्या अर्जांची संख्या सुमारे ८७ हजार ०९८ इतकी आहे. त्यात अपूर्ण भरलेले अर्ज १६ हजार ३५७, पूर्ण भरलेले मात्र कन्फर्म न केलेल्या अर्जांची संख्या ४६ हजार ३२२ आणि कन्फर्म अर्जांची संख्या २४ हजार ४१९ इतकी आहे. त्यामुळे अवघ्या आठवड्याभरात मिळालेला प्रतिसाद पाहता एकूण दोन लाख अर्ज येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
अभियांत्रिकी पदवीच्या आॅनलाईन प्रवेशासाठी राज्यातील एकूण १० विद्यापीठांसह इतर विद्यापीठे आणि स्वायत्ता संस्था आणि राज्य शासन मान्यता असलेल्या स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करता येतात. मात्र स्वायत्ता संस्था आणि राज्य शासन मान्यता
असलेल्या स्वायत्त संस्थांमधील
एकही विद्यार्थ्याने यावेळी अर्ज केलेला नाही. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकी पदवीचे संभाव्य वेळापत्रक
२ जून ते १६ जूनदरम्यान आॅनलाइन अर्ज भरता येतील.
२ जून ते १७ जूनदरम्यान कागदपत्रांची तपासणी आणि सुधारणा करता येईल.
दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुविधा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज निश्चिती करता येईल.
१९ जूनपर्यंत संभाव्य
गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
१९ जून ते २१ जूनदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत यादीवर असलेल्या हरकती सुविधा केंद्रावर जाऊन मांडता येतील.
२२ जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

Web Title: 24 week application confirmation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.