आश्रमशाळांच्या चौकशीसाठी २४ पथके
By Admin | Updated: November 18, 2016 20:27 IST2016-11-18T20:27:41+5:302016-11-18T20:27:41+5:30
जिल्ह्यातील नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळा व वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेसंदर्भातील चौकशी सुरू झाली असून त्यासाठी महिला सदस्यांची २४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

आश्रमशाळांच्या चौकशीसाठी २४ पथके
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 18 - जिल्ह्यातील नंदुरबार आणि तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळा व वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेसंदर्भातील चौकशी सुरू झाली असून त्यासाठी महिला सदस्यांची २४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेतील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आश्रमशाळांची चौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी नंदुरबार प्रकल्पात १४ तर तळोदा प्रकल्पात १० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात महिला अधिकाऱ्यांसह तीन महिला सदस्यांचा समावेश आहे.