शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘फुले योजने’साठी २,२०० कोटींचा प्रस्ताव; पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:44 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आल्याची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली. मात्र, सात महिने उलटून गेल्यावरही योजना लागू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या अधिकच्या खर्चासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २२२७ कोटींचा प्रस्ताव दिला असल्याचे सूत्रांनी सांगतिले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. 

    या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले आहे. राज्यातील १९०० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६वरून १,३५६ इतकी केली.    सध्याच्या योजनेसाठी इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबासाठी ८५५ रुपये इतका प्रीमियम सरकारतर्फे दिला जातो. त्यासाठी शासन वर्षाला १,७७० कोटी रुपये देते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड लाखाचे कवच असलेली योजना आता पाच लाखांची करून राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विमा कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियम बदलणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य