औरंगाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: August 28, 2015 18:57 IST2015-08-28T18:56:48+5:302015-08-28T18:57:10+5:30
औरंगाबादमधील सुंदरवाडी शिवार येथे मित्रासोबत फिरायला आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

औरंगाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद. दि. २८ - औरंगाबादमधील सुंदरवाडी शिवार येथे मित्रासोबत फिरायला आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अद्याप या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.
गुरुवारी रात्री २२ वर्षीय तरुणी व तिचा मित्र सुंदरवाडी शिवार येथील रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. या दरम्यान चार जणांचे टोळके तिथे आले व इथे काय करताय अशी विचारणा केली. काही वेळाने या टोळक्याने संबंधीत तरुणीच्या मित्राला बेदम मारहाण केली. मदत मागण्यासाठी पिडीत तरुणीचा मित्र तिथून निघून गेला. मात्र यानंतर चौघा नराधमांनी तरुणीला रस्त्यालगतच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी चिखलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.