२२ हजार शिक्षक वेतनापासून वंचित

By Admin | Updated: February 13, 2016 01:54 IST2016-02-13T01:54:41+5:302016-02-13T01:54:41+5:30

राज्यातील ‘प्लान’मधील शाळा व वर्ग तुकड्यांवर काम करणाऱ्या २२ हजार शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर

22 thousand teachers are deprived of salary | २२ हजार शिक्षक वेतनापासून वंचित

२२ हजार शिक्षक वेतनापासून वंचित

मुंबई : राज्यातील ‘प्लान’मधील शाळा व वर्ग तुकड्यांवर काम करणाऱ्या २२ हजार शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीचे वाटप वेळेवर न झाल्याने हा प्रकार घडला आहे. राज्य शासनाने अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यात १ तारखेला वेतन न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनाबाबत सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिषदेमार्फत केली आहे. सन २०१५-१६साठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीचे वाटप व वितरण वेळेवर न झाल्याने राज्यातील प्लानमधील सुमारे २२ हजार शिक्षकांची ३ महिन्यांपासून उपासमार होत असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. याबाबत परिषदेने राज्याच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिवांकडेही प्लानमधील शाळांचे वेतन देण्याची मागणी केली आहे. तरी शालेय शिक्षण विभागानेही जातीने लक्ष घालून वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी बोरनारे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 22 thousand teachers are deprived of salary