जमीन व्यवहारात २२ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: July 2, 2016 01:53 IST2016-07-02T01:53:47+5:302016-07-02T01:53:47+5:30
पाटस (ता. दौंड) येथे व्यवसायासाठी जमीन देतो, असे सांगून २२ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार बालाजी गावले यांनी दौंड पोलिसांना दिली.

जमीन व्यवहारात २२ लाखांची फसवणूक
दौंड : पाटस (ता. दौंड) येथे व्यवसायासाठी जमीन देतो, असे सांगून २२ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार बालाजी गावले यांनी दौंड पोलिसांना दिली.
दरम्यान, या प्रकरणी सुनील साळुंखे, शहाजी चव्हाण (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली. दौंड येथे माझा फॅब्रिकेशन आणि वेल्डिंगचा व्यवसाय आहे. तेव्हा आम्हाला व्यवसायासाठी जागा पाहिजे होती. त्यानुसार माझ्या ओळखीचे शहाजी चव्हाण यांच्याकडे जमिनीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले. पाटस येथील सुनील साळुंखे यांच्या मालकीची जागा असून त्यांनी पाच गुंठे जागा विक्रीस काढली आहे. त्यानुसार जागा घेण्याचे ठरले. २९ लाख रुपयांच्या व्यवहारापोटी आम्ही २२ लाख रुपये सुनील साळुंखे यांना दिले व उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळेला देतो, असा व्यवहार २०१५ मध्ये झाला. त्यानंतर वेळोवेळी जमीन खरेदीबाबत साळुंखे यांना विचारणा केली असता. महिन्यात करतो, दोन महिन्यात करतो, असे उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली असल्याचे बालाजी गावले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)