‘पाणी अडवा’त जिरले २२ लाख ?

By Admin | Updated: February 12, 2015 05:51 IST2015-02-12T05:51:02+5:302015-02-12T05:51:02+5:30

महाडमधील खर्डी गावात सरकारच्या ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत वनराई वसुंधरा पाणलोट प्रकल्पात बेकायदा कामे केल्यामुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाले आहे.

22 lakhs of water cuts? | ‘पाणी अडवा’त जिरले २२ लाख ?

‘पाणी अडवा’त जिरले २२ लाख ?

जयंत धुळप, अलिबाग
महाडमधील खर्डी गावात सरकारच्या ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत वनराई वसुंधरा पाणलोट प्रकल्पात बेकायदा कामे केल्यामुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तक्रार केल्यास ‘वाळीत टाकण्यात येईल’अशी धमकी संदेश उदय महाडीक याला खर्डी गावच्या ग्रामसभेत देण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यास तब्बल २२ लाख ८२ हजार ७८३ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीय यईल, म्हणून दबाव आणण्यात येत आहे, असे महाडीक यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी महाड पोलिसांनी केवळ ‘अदखल पात्र’ गुन्हा नोंदवला आहे.
संदीपचे वडील उदय महाडीक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता त्यांना न्यायालयात तक्रार दाखल करण्यास सांगितले. पोलीस भ्रष्टाचारी धेंडांची पाठराखण करत असल्याचे महाडीक यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना ६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भविष्यातही हल्ले होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 22 lakhs of water cuts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.