‘हवाला’चे २२ लाख पकडले

By Admin | Updated: December 23, 2015 01:57 IST2015-12-23T01:57:23+5:302015-12-23T01:57:23+5:30

हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने २२ लाख रुपये मंगळवारी पहाटे जप्त केले

22 lakhs of 'hawala' caught | ‘हवाला’चे २२ लाख पकडले

‘हवाला’चे २२ लाख पकडले

जळगाव : हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने २२ लाख रुपये मंगळवारी पहाटे जप्त केले. हे पैसे हवाला व्यवहाराचे असल्याचा संशय आहे.
रणजित ठाकूर (गुजरात) बडनेरा येथून सूरतला जात होता. तपासणी मोहिमेत पोलिसांना संशय आल्याने त्यास रेल्वे पोलिसांनी अटक केली. गाडीची तपासणी करताना पथकाला एस-१ डब्यात दरवाजाजवळ रणजित उभा असलेला दिसला. त्याच्याकडे जनरलचे तिकीट होते. है पैसे तो सुरत येथील नीलकंठ अ‍ॅण्ड कंपनीला देण्यासाठी जात होता. त्याने वर्तमानपत्राच्या कागदांमध्ये पैसे गुंडाळले होते. (प्रतिनिधी)

Web Title: 22 lakhs of 'hawala' caught