शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 15:48 IST

Railway Accident in Narkhed: अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना    रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना    रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे रुळाचे चाव्या (फिश प्लेट) काढण्यात आल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील सोफिया औषनिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा मालगाडीने नेला जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. मालगाडीचे चालक सुद्धा हैराण झाले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी ८ ते १० तास लागणार आहे. अकोला येथून मालगाडीचे डबे उचलण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने रविवारी नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर, या मार्गावरून धावणारी जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. मालगाडीचे डबे घसरल्याने मालहानी झाली अन्यथा,नरखेड - काचीगडा एक्स्प्रेस घसरली असती तर स्वातत्र्यदिनाच्या दिवशी मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शीनीचे म्हणणे आहे. 

 रेल्वे सुरक्षा बलाची गस्त नाहीअमरावती - नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, एक किमी अंतरापर्यंत रुळाच्या चाव्या चोरीस जात असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बला च्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँग मनला देखील चाव्या चोरीस गेल्या असताना दिसल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशाच्या जीविताशी खेळ चालविल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातAmravatiअमरावती