घरफोड्यांच्या टोळीकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: June 21, 2016 18:02 IST2016-06-21T18:02:37+5:302016-06-21T18:02:37+5:30
शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी तसेच वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या संशयितांकडून सोन्या-चादींचे दागिने, चारचाकी, दुचाकी वाहन असा

घरफोड्यांच्या टोळीकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 21 - शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी तसेच वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ या संशयितांकडून सोन्या-चादींचे दागिने, चारचाकी, दुचाकी वाहन असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़
पोलिसांनी घरफोडी करणारे संशयित अतुल ज्ञानेश्वर गायकवाड, भाऊसाहेब उर्फ विल्या संजय निकम, अजय सुनील वडनेरे, मनोज बाळासाहेब उर्फ राजेंद्र रणशूर, सागर उर्फ बापू कैलास भोसले या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे़ हे पाचही संशयित अट्टल गुन्हेगार असुन त्यांनी आतापर्यंत आडगाव, गंगापूर, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सुमारे डझनभर घरफोड्या केल्या आहेत़ हे पाचही संशयित निफाड तसेच लाखलगाव परिसरातील रहिवासी आहेत़
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी खास पोलीस पथक कार्यान्वित करण्यात आले होते़ या संशयितांकडून पोलिसांनी पुणे येथून चोरलेली इनोव्हा कार, पाच दुचाकी, सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने, चार एलसीडी, दोन कॅमेरे असा २१ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ विशेष म्हणजे या संशयितांनी मनमाड, येवला व निफाड तालुक्यातील शेतमजूरांना दुचाकीची विक्री केली होती़
आडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, शंकर होनमाने, सुरेश गवळी, किसन चकोर, संजय जाधव, विनोद लखन, राजू साबळे, राजेंद्र शिरसाठ, गणेश रोकडे, लक्ष्मण बोराडे, के.टी.गोडसे, मुनीर काझी, यशवंत गांगुर्डे, देवराम वनवे, मिथुन गायकवाड, दिवटे, आदि कर्मचार्यांनी ही कामिगरी केली आहे.(वार्ताहर)