शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

२०२५ : विकासाच्या नकाशावर कुठे असेल आपला महाराष्ट्र? ‘लोकमत’च्या राज्यस्तरीय परिषदेत उलगडणार विकासाचा रोडमॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 10:25 AM

Maharashtra News: समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.

 मुंबई : समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. बुधवार, ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेत विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडणार आहेत.नागरी भागातील पायाभूत सुविधांची स्थिती, उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी पायाभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अर्थकारण, गृहनिर्माणातील आव्हाने, महानगरपालिकांच्या सेवांचा दर्जा वाढविणे यांच्याशी निगडित विषयांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे. त्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. त्यांच्यासोबत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर,  एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त  सोनिया सेठी,  सिडकोचे एमडी संजय मुखर्जी,  एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा, साईबाबा संस्थानच्या सीईओ  भाग्यश्री बनायत हे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विकास नकाशाची मांडणी करणार आहेत. 

विविध महत्त्वाच्या विषयांवर होणार मंथनn लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह -२०२१ मध्ये पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती, त्यातील बदलाचे मोठे टप्पे, त्यातील अडचणी, त्यावरची उपाययोजना आदींबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. n त्याशिवाय, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विभागाचे सध्याचे प्रकल्प, आगामी विस्तार, त्याची आर्थिक बाजू, प्रकल्प व्यवस्थापन याचे सादरीकरणही करणार आहेत. या परिषदेत होणाऱ्या चर्चेतून राज्याच्या विकासपथावरील वाटचालीचे सर्वांगीण चित्र उभे राहणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई