शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

 2022पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटेल, हवाई, रस्ते वाहतुकीत होतील मोठे बदल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले.

नवी मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर सभास्थळी उपस्थितांना मोदींनी संबोधित केले. मोदी म्हणाले, 2022पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने पॉलिसी आणली. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचे सूतोवाच मोदींनी केले  आहेत. देशात 450 खासगी सरकारी विमाने आहे. सरकारने 900 नवीन विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत होणार आहे. 1997मध्ये अटलबिहारी सरकारने विमानतळांचे स्वप्न पाहिले होते. परंतु नंतरच्या सरकारने काहीही केले नाही. हा प्रोजेक्ट कागदावर होता. आम्ही सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. लटकाना.. अटकाना.. पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.सागरी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करण्याची सरकारची योजना आहे. सागरी मार्गाचा वापर केल्यास कमी वेळेत जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात माल पोहोचवू शकतो. साडेसात हजार किलोमीटरच्या समुद्राचा आपण लाभ घेतला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत भारताला प्रभुत्व मिळवायचं असल्यास सागरी मार्गाच्या ताकदीला वाढवलं पाहिजे. जागतिक बाजारपेठेत सामूहिक व्यापार महत्त्वाचा असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनीही सामरिक ताकद ओळखली होती, असंही मोदी म्हणाले आहेत. तसेच नितीन गडकरींच्या नेतृत्वात भारतातील रस्ते वाहतुकीत प्रगती होत असून, भारताच्या पॉवर सेक्टरला नवी चालना मिळाल्याचं मोदींनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNavi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ