मेट्रोमधून ७८६ दिवसांत केला २0 कोटी जणांनी प्रवास

By Admin | Updated: August 2, 2016 05:41 IST2016-08-02T05:41:35+5:302016-08-02T05:41:35+5:30

मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

200 million people traveled through the Metro in 786 days | मेट्रोमधून ७८६ दिवसांत केला २0 कोटी जणांनी प्रवास

मेट्रोमधून ७८६ दिवसांत केला २0 कोटी जणांनी प्रवास


मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होताच ती प्रवाशांच्या पसंतीस पडली. मेट्रोमधून ७८६ दिवसांत तब्बल २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता मुंबई मेट्रो वन कडून वर्तविण्यात येत आहे.
४,५०० कोटी रुपये खर्चून घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रोचे भाडे सुरुवातीला दहा रुपये ठेवण्यात आल्याने, रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला, तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने, आकडा आणखीच वाढत गेला. त्यानंतर, मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्यात आली असली, तरी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली नाही. आतापर्यंत मेट्रोतून २0 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली. कामाच्या दिवशी मेट्रोतून दररोज ३ लाख ४0 हजार प्रवासी ये-जा करतात. जुलैमध्ये १८ टक्के प्रवासी वाढले असल्याचे सांगण्यात आले. ४00 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती. (प्रतिनिधी)
>400 दिवसांत मेट्रोने दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली होती.

Web Title: 200 million people traveled through the Metro in 786 days